जेऊर ग्रामसेवक कुदळे यांचा आ. संजय मामा शिंदे यांनी केला सन्मान ; जिल्हाधिकारी यांच्याकडे केली शासकीय सन्मानासाठी शिफारसकरमाळा

१४ ऑक्टोबर रोजी सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसावेळी जेऊर मध्ये आपत्ती काळात जेऊर चे ग्रामसेवक यशवंत कुदळे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे त्याबद्दल त्यांचे तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद वाटत आहे, या शब्दात आमदार संजय मामा शिंदे यांनी ग्रामसेवक कुदळे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला.

या वेळी युवा नेते पै माणिक (दादा ) पाटील, रविदादा वळेकर,  संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष बालाजी गावडे, राहुल घोरपडे साहेब, समीर केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी ग्रामसेवक कुदळे यांचा शासकीय पातळीवर सन्मान व्हावा अशी शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे पत्र संबंधित यंत्रणेला ताबडतोब दिले. पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की तरुण ग्रामसेवक कुदळे यांनी केलेले धाडसी काम व समयोचित आहे स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी नवजात बालके लहान मुले अपंग वयोवृद्ध यांना पुरातून बाहेर काढून खूप चांगले काम केले आहे, त्यांचे कार्य मला पै दादा पाटील व बालाजी गावडे यांच्याकडून समजले व त्यांचा सन्मान करण्याचे मी त्याच वेळी ठरवले होते तो योग आज आला मी स्वतः शासकीय पातळीवर प्रयत्न करून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहे.
 आपत्ती काळातील ग्रामसेवक कुदळे यांचे कार्याचे सर्व स्तरातील मान्यवर कौतुक करत आहेत.

Post a Comment

0 Comments