प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळणारच : पंतप्रधान नरेंद्र मोदी


सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. 

कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा दावा केला. “कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळालं. लॉकडाउन लागू करण्याचं आणि अनलॉक करण्याची वेळही योग्यच होती,” असं मोदी म्हणाले. “करोनाचं संकट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सतर्क राहणं आवश्यक आहे. 

प्रामुख्यानं सणासुदीच्या वेळी सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही वेळ नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

Post a Comment

0 Comments