"राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने इंदिरा गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन "

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी  

 जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर व  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारताच्या पहिल्या महिला निर्भिड पंतप्रधान कालवश इंदिराजी गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय एकात्मतेचे संघर्ष नायक  कालवश सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ.तुषार घाटगे यांनी केले. प्रारंभिक इंदिरा गांधी व सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून  अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी इंदिराजी गांधी यांच्या माहीत नसलेल्या काही राजकीय व आर्थिक घडामोडीची मांडणी करताना भांडवलदारांना शह देण्यासाठी तसेच बँकिंग व्यवस्थेचा लाभ सामन्यांना व्हावा यासाठी त्यांनी १९ जुलै १९६९ मध्ये  जाणीपूर्वक १४ बँकेचे व १९८० मध्ये ८ बँकेचे राष्ट्रीयीकरण केले. त्याचबरोबर त्यांनी सुरू केलेली पहिली नोटबंदी ही त्या काळात लोक हिताय होती अशाप्रकारचे प्रकारचे प्रतिपादन करून त्यांच्या १९७१ मधील बांगला-पाकिस्तान युद्धातील आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी व दूरदृष्टीचे कौतुक केले. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलन व लोकसंख्या नियोजनासाठी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. प्रथम स्त्री महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच  सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी मत प्रदर्शित करताना पटेल यांनी  भारत एकसंघ रहावा यासाठी योग्य राजकीय व आर्थिक नियोजन  पद्धतीचा वापर करून हा देश एकत्रित केला. पटेल यांना जाणीवपूर्वक एका राजकीय पक्षात व विचारांमध्ये  गुंतवले  जाते.परंतु पटेल यांनी केलेलं कार्य यामुळे मागे राहत नाही. खरोखरच पटेल यांनी स्वातंत्र्यसंग्राम व सामाजिक सुधारणा चळवळ यासाठी दिलेले योगदान हे या देशाच्या  गौरवशाली इतिहासाचे मूल्ये मानावी लागतील अशा प्रकारचे मत व्यक्त करून त्यांच्या कार्याला त्यांनी विनम्र अभिवादन केले.
  
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उप प्राचार्य ,डॉ.सुनील बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संजीव मगदूम (कार्यालयीन अधिक्षक ),प्रा.डॉ. प्रभाकर माने,(एन.एस.एस.,कार्यक्रमाधिकारी)प्रा.सौ.डी. एस.बामणे, प्रा. सौ. एस. जी.संसुद्धी,प्रा.डॉ.व्ही. बी.देवकर, प्रा.सौ.व्ही. व्ही. चौगुले, प्रा. नितीश सावंत,प्रा. चिकोडे,प्रा. आर. डी. शिंदे,प्रा. सुनिल चौगुले,प्रा.एस.बी.डफळा पूरकर, संजय चावरे, सतीश शेटे,प्रदिप सुतार, ए.बी.कांबळे,सुहास हिरुकडे,अमित मगदूम, आय. आर. पाटील, बाहुबली भनाजे, श्री. नलवडे, श्रीमती झेले, मेहबूब मुजावर, जीवन आवळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments