ऑफिसमधील ‘या’ वस्तूंना करू नका सॅनिटायज; शासनाने काढला आदेश….



मुंबई :  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत संगणक / मॉनिटर वर सॅनिटाईझर फवारणी (रप्रे) न करण्याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. परंतु हा आदेश संबंधित विभागा पुरताच मर्यादित नसून याचा अवलंब संगणकाच्या सर्व वापरकर्त्यांनी करणे आवश्यक आहे.

कोव्हीड-१९ संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सदर रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता सर्वत्र सॅनिटायझर वापरण्यात येत आहे. विभागात एखादा कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास महानगरपालिका / सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधित कार्यासनात तसेच मजल्यावर रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येते.

तसेच काही कर्मचारी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून संगणक / मॉनिटर वर सॅनिटाईझर फवारणी (स्प्रे) करतात. यासंदर्भात असे निदर्शनास आले आहे की, सदर फवारणी करतांना औषधीद्रव्य संगणकावर पडून ते संगणकांच्या आत गेल्यास संगणकाचा डिस्प्ले बंद पडतो. यामुळे विभागातील काही संगणक बंद पडल्याचे आढळून आले आहे. यास्तव, सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कळविण्यात येते की, रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करतांना संगणकावर औषधीद्रव्य पडणार नाही याबाबत संबंधितांना सुचना देण्यात याव्यात. तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संगणक / मॉनिटर वर सॅनिटाईझर फवारणी (स्पे) करु नये व संगणकावर सॅनिटाईझर वा संबंधित द्रव्य पडणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. असा आदेश काढण्यात आला आहे.

या आदेशावरून आपणही सावध होऊन वैयक्तिक अथवा खाजगी नोकरीच्या ठिकाणी (जेथे जेथे संगणकाचा वापर होतो तेथे ) वापरत असलेल्या संगणकावर आणि मोबाईलवर सॅनिटाईझरचा वापर काळजीपूर्वक करावा. 

 

Post a Comment

0 Comments