बार्शी: म्हाडा कॉलनीतील घरावर वीज कोसळली; घरांचे नुकसान


बार्शी /प्रतिनिधी;

 वादळी वाऱ्यासह बार्शी तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसाच्या तडाख्यात आयटीआय कॉलेजवळील म्हाडा रोड येथे वीज कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री ९ च्या सुमारास हि घटना घडली, म्हाडा कॉलनीतील ओम शांती कॉलनीत राहणाऱ्या सैय्यद कुटुंबीयांच्या घरावर ही वीज कोसळली असून कुटुंबीय भयभीत झाले आहे. 
शुक्रवारी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास ही वीज कोसळली. त्यानंतर, त्यांच्या घरातील लाईट-फिटींग व वायरींग पूर्णपणे जळाल्याचे सैय्यद कुटुंबीयांनी सांगितले. हुसेन सैय्यद असे कुटुंबातील प्रमुखाचे नाव असून कुटुंबात एकूण ५ जण राहतात. या दुर्घटनेत छतावरील भिंतीचे कोपरे तुटून त्याचे तुकडे १०० मिटरपर्यंत दूर पडले आहेत.

Post a Comment

0 Comments