करमाळा मतदारसंघातील रस्त्यासाठी १ कोटी १५ लाख मंजुर - जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे


करमाळा/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गट ब योजनेंतर्गत ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग रस्यासाठी करमाळा विधानसभा मतदारसंघाततील रस्त्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या सूचनेवरून १ कोटी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहीती देताना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले की,करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कामासाठी तात्काळ निधी मिळवा यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी सुचवलेल्या रस्त्यासाठी जिल्हा परिषद गट ब अंतर्गत निंभोरे-भाळवणी रस्ता( १५ लाख), रोपळे -घोटी रस्ता -(१२ लाख)धायंखिंडी -करंजे (१५ लाख),केडगांव ते शेटफळ (१५ लाख)आवाटी-नेर्ले-मुंगशी तालुका हद्द (१५ लाख),नाडी-मुंगशी (१४.५०लाख), डवळस-कुर्डुवाडी (१४.५० लाख),आवाटी-लोणी तालुका हद्द (१५लाख) या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असुन लवकरच या रस्त्याची कामे सुरु होणार आहेत.

भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्त जास्तीत निधी उपलब्ध करून देण्यावर आपला भर रहाणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले. यावेळी केमचे माजी सरपंच अजित तळेकर ,सभापती गहिनीनाथ ननवरे, पै.पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments