पंढरपूर ! सावत्र आईचा मुलाने केला खून...सोलापूर/प्रतिनिधी:

शहरातील भक्ती मार्गावरील लक्ष्मी नगरमध्ये सावत्र मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. 
 सावञ मुलगा संजय कदम याने चाकुने सपासप वार करीत सावञ आई प्रभावती मधुकर कदम (वय ४५) यांचा निर्घृणपणे खून केला. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली आहे.

प्रभावती मधुकर कदम या राहत्या घरात एकट्याच असताना त्याचा मुलगा संजय उर्फ भोला मधुकर कदम याने धारदार शस्त्राने त्याची हत्या करून घराला बाहेरून कडी लावून निघून गेला. थोड्यावेळाने त्याच्या सावत्र बहिणीने घराची कडी उघडली असता तिला आईचा खून झाल्याचे दिसले. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी भेट दिली आहे.

प्रभावती मधुकर कदम यांचे पती मधुकर कदम यांचा १५ दिवसापूर्वी ‘कोरोना’ने मृत्यू झाला होता. त्यांना दोन सावत्र मुले व एक मुलगी असा परिवार आहे. संजय उर्फ भोला कदम यांना शोधण्याचे काम पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments