पांगरी ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटरचे उद्घाटन


पांगरी/प्रतिनिधी : 

आज ग्रामीण पांगरी रुग्णालय येथे मान्यवरांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.कोरोना बाधित गरोदर मातांसाठी १० ऑक्सिजन बेड व इतर कोविड रुग्णांसाठी १० ऑक्सिजन बेड या सेंटरमध्ये असणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे सपोनि सुधीर तोरडमल, जि. प.सदस्या रेखा राऊत,प्रा.विशाल गरड,सरपंच इंनूस बागवान हे होते.

हे ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी अमृत असून,रुग्णांसाठी याचा मोठा फायदा होईल.असे मत प्रा.विशाल गरड यांनी मांडले.कोरोना होवू नये यासाठी प्रत्यकाने मास्क,सॅनिटाझरचा वापर करावा,असे यावेळी सपोनि सुधीर तोरडमल यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालयातील सुविधेसाठी वेळोवेळी प्रयत्न करेन असा शब्द जि .प.सदस्या रेखा राऊत यांनी दिला.

Post a Comment

0 Comments