ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या वनव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केलेला असून सर्व जिल्हाधिकारी यांना राज्य निवडणूक आयोगाने पत्र काढलेले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये निवडणूका होतील की नाही अशी शंका असताना अखेर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजवला.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक २९ /११/ २०१९च्या आदेशान्वये राज्यातील माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम देण्यात आलेला होता राज्यात कोरून विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज प्रभाग रचना मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक दिनांक १७ मार्च २०२० रोजीच्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आयोगाच्या दिनांक १७ मार्च २०२० च्या पत्रान्वये आदेशित करण्यात आले मुक्त कार्यक्रम प्रभाग रचना अंतिम करण्याचा टप्पा स्थगित करण्यात आला.

आत्ता लाॅकडाऊन मध्ये शिथीलता अणण्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात येत आहेत सदर व विचारात घेता प्रभाग रचनेच्या अंतिम टप्प्या साठी खालील प्रमाणे सुधारित कार्यक्रम देण्यात येत आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांना प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे मंगळवार दिनांक २७/१०/ २०२० रोजी करावयाचे आहे.
जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला नमुना मध्ये व्यापक प्रसिद्धी देणे सोमवार दिनांक ०२/११/२०२० असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे.

Post a Comment

0 Comments