पंढरीतील एक एका पेट्रोल पंपावरून ३ हजार ४४७ लिटर डीझलची चोरी



पंढरपूर/प्रतिनिधी:

तालुक्‍यातील वाखरी येथील एका पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यांनी ३ हजार ४४७ लिटर डिझेल पळवून नेले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ ते बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली. दोन लाख ५९ हजार ४२० रुपये किमतीचे डीझल आहे. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी,

 पंढरपूर - वेळापूर रस्त्यावर वाखरी हद्दीत बाजीराव विहिरीजवळ सुवर्ण शशिकांत टोणपे यांचा श्री सिद्धनाथ पेट्रोलियम नावाचा पंप आहे. या पंपावर राजन बळिराम थोरात  हे मॅनेजर म्हणून काम करतात. दररोज किती पेट्रोल, डिझेलची विक्री झाली याचा हिशेब पंपावरील कामगारांकडून घेत असतात. २७ ऑक्‍टोबर रोजी रात्री नऊ वाजता पंपावर अतुल काळे आणि चिदानंद कोळी हे दोन कामगार पंपावर कामावर होते.

२८ रोजी सकाळी अतुल काळे यांनी मॅनेजर थोरात यांना फोन करून पंपावरील डिझेल, पेट्रोल साठ्याच्या टाकीचे कुलूप तोडून बाजूस पडले असल्याचे फोन करून सांगितले. थोरात यांनी पंपावर जाऊन पाहणी केली. पंपावरील डिझेल टाकीत ८ हजार ८० लिटर डिझेल होते, त्यापैकी ११३५ लिटरची विक्री झाल्याने ६९४५ लिटर डिझेल शिल्लक असावयास पाहिजे होते. परंतु टाकीत ३ हजार ४९८ लिटरच साठा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी डिझेल टाकीतील २ लाख ५९ हजार ४२० रुपये किमतीचे ३ हजार ४४७ लिटर डिझेल उपसा करून पळवून नेले असल्याची फिर्याद थोरात यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय पाटील,  पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांनी भेट दिली. अधिक तपास प्रकाश उमाप करत आहेत.

या प्रकरणीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी श्वानाची मदत घेण्यात आली. पंपावरील डिझेल, पेट्रोल साठ्याच्या टाकीचे कुलूप तोडलेल्या बाजू श्वासाच्या माध्यमातून तपास करण्यात आला. त्यात श्वास काही अंतर गेल्यानंतर पुढील वाट न सापडल्यामुळे पोलिसांनी तपास थांबला.

Post a Comment

0 Comments