बिहारमध्ये ‘जर’ किंवा ‘तर’ नाही, नितीशकुमारच होणार मुख्यमंत्री; अमित शाहांची जाहीर घोषणा


 बिहारमध्ये ‘जर-तर’चा प्रश्न असणार नाही. जदयूपेक्षा भाजपाच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच होणार अशी जाहीर घोषणाच गृहमंत्री अमित शाह केली. शाह म्हणाले, “राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बिहार विधानसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. 

 बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील, याची आम्ही सार्वजनिकरित्या घोषणा केली आहे आणि आम्ही याला बांधील आहोत. जरी भाजपाने जदयूपेक्षा जास्ता जागा मिळवल्या तरीही.” “बिहारच्या लोकांना डबल इंजिनचे सरकार मिळणार आहे. एक राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली.” 

NDA मधील फूट :

 लोकजनशक्ती पार्टीच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शाह म्हणाले, “लोजपाला आम्ही पुरेशा जागा दिल्या होत्या मात्र तरी देखील ते बाहेर पडले. हा त्यांचा निर्णय आहे आमचा नाही.” कोणत्याही भ्रमात राहू नका; भाजपाने चिराग पासवान यांना सल्ला दिला आहे.

Post a Comment

0 Comments