" जयसिंगपूर कॉलेजमध्ये ' माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाला राष्ट्रीय सेवा योजनेकडून प्रतिसाद "

प्रा.डॉ.प्रभाकर माने / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

 शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राज्य व केंद्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार कोरोना महामारीच्या काळात प्रा. डॉ.अतुलजी साळुंखे ( प्रमुख,एन.एस.एस.महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. अभयजी जायभाये ( प्रमुख,एन.एस.एस. शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांच्या नेतृत्वाखाली व प्रा. डी.जी. चिगळीकर (समन्वयक,कोल्हापूर जिल्हा) यांच्या सहकार्याने कोरोना काळात सर्व प्रकारचे उपक्रम शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधील राष्‍ट्रीय सेवा योजना(NSS) विभागाच्यावतीने कृतिशील अंमलबजावणी केली जात आहे. 
त्याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या अभियानाअंतर्गत कॉलेजमधील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अर्थात त्याचे तापमान मोजणे, हृदयाचे ठोके मोजणे व ऑक्सिजन पातळी मोजणे इत्यादी सारखे आरोग्यविषयक प्रश्न हाताळण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे आहे अशा प्रकारचं मत व्यक्त करून या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रभाकर माने (कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. जयसिंगपूर  कॉलेजचे प्रभारी प्राचार्य ,प्रा.डॉ.एस. ए.मांजरे यांनी महाविद्यालयाच्या NSS विभागाने कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक करून  या अभियानाअंतर्गत हा विभाग कॉलेज  कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेणार आहे त्याचबरोबर २७ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा काळात परीक्षेसाठी प्रवेशित होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ही अशा प्रकारच्या आरोग्यविषयक तपासणी  केली जाणार आहे.त्यादृष्टीने शासनाचे हात बळकट करण्याची भूमिका आहे अशा प्रकारचे मत प्रतिपादन केले.त्याचबरोबर श्री.संजीवजी मगदूम (कार्यालयीन अधिक्षक)यांनी हा उपक्रम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे याविषयी त्यांनी स्वतःचा अनुभव कथन केला.तर श्री. सुहास हिरुकडे (सदस्य,कॉलेज विकास समिति)यांनी या अभियानाला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी  या अभियानाला मनापासून सुरुवात केली. 
   
 देशात कोरोना महामारीने रौद्र रूप धारण केले असून त्याचा सकल मानवतेला  प्रचंड मोठा सर्व पातळीवर त्रास होत आहे. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणनेू मात्र थैमान  घातले असून त्याचा त्रास सर्व पातळीवर आरोग्य,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व अन्य क्षेत्रावर अत्यंत नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागत आहे.महाराष्ट्र शासन नेहमीच राज्यातील आपल्या जनतेचा आरोग्य, हित व कल्याण उत्तम राहून राज्याचा गावगाडा व्यवस्थित चालावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सातत्याने काम करीत आहे.परंतु कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यामध्ये सरकार वचनबद्ध असून त्यासाठी शासकीय व सर्व पातळीवर कार्यरत आहे. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कोरोनाच्या साथीला प्रतिबंधित करण्यासाठी सुरुवातीपासूनच शासनास उत्तम सहकार्य व सकल मानवतेच्या हितासाठी अग्रेसर व कार्यरत आहे.
  सदर अभियानासाठी डॉ.सुभाष अडदंडे(चेअरमन, स्थानिक व्यस्थापन समिती), डॉ.महावीर अक्कोळे (सचिव, स्थानिक व्यवस्थापन समिती)व इतर सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी श्री. बाहुबली बनाजी यांनी शासनाच्या या अभियानाचे व जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कौतुक करुन त्यांनी हे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी एन.एस.एस.ॲम्बेसिडर जीवन आवळे यांनी एन.एस.एस. स्वयंसेवक यासाठी कटिबद्ध असून हे कार्य आम्ही प्रामाणिकपणे करीत राहू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी कु. भाग्यश्री लिगाडे,कु. दिपाली आगळे,श्री.रमेश घाटके,श्री आदित्य कोळी व अन्य राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments