उस्मानाबाद-पुणे इंटरसिटी सुरू करा, खासदार ओमराजेंची मागणीभारतीय मध्य रेल्वेची पश्चिम विभागाची विभागीय बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीस मुंबई येथुन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदवून उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातील उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर नविन रेल्वेमार्ग साठी व भूसंपादन साठी पर्याप्त निधी उपलब्ध करण्यात यावा. या रेल्वे मार्गाला गती कशी येण्यासाठी रेल्वेचे ऑफीस भुसावळला स्थलांतरीत करण्यात आले आहे ते रद्द करण्यात यावे. तसेच उप मुख्य अभियंता चीफ इंजीनियर हे पद तात्काळ भरावे. व जिल्हयासाठी एक नोडल ऑफीसर यांची नेमणूक करण्यात यावी.
पुणे-उस्मानाबाद-लातूर इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात यावी. बिदर -लातूर-मुंबई या रेल्वे गाडीची जनरल डब्बे वाढवण्यात यावे. व लातूर-मुंबई दिवसा एक रेल्वे गाडी सुरू करण्याची आवश्यक आहे. तसेच कोल्हापूर-नागपूर आठवड्यातुन दोन वेळा गाडी चालू करण्यात यावी.

२० वर्षांपासून कळंब रोड स्टेशन (कसबे तडवळा), ढोकी स्टेशन या दोन्ही स्थानका पैकी एका स्टेशनला एक्सप्रेस रेल्वेना थांबा देण्यात यावा. तसेच उस्मानाबाद-ढोकी हायवे ढोकी रेल्वे क्रॉसिंग, गोवर्धनवाडी गाव जवळ, ओव्हर ब्रिज तसेच तेर, बुकणवाडी, ढोराळा, जागजी, भिकारसारोळा आदी गावास व शेतात जाणारा साईट रस्ता दुरुस्ती करण्यात यावी. अशा विविध उस्मानाबाद रेल्वे विकास कामा संदर्भात प्रामुख्याने मुद्दे बैठकीत उपस्थित केले.

यावर सोलापूर- तुळजापूर -उस्मानाबाद नविन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनी व भूसंपादन प्रक्रियेस वेग येण्याच्या दृष्टीने प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याकरीता भुसंपादन समिती नेमणूक करावी यासाठी अतिरिक्त ५ कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. येत्या चार ते पाच महिन्यात नविन मार्गाचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गाला गती येण्यासाठी सोलापूर येथे वरीष्ठ खंड अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आवश्यक भासल्यास आणखीन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात येईल आल्याचे सांगितले. विभागाच्या व मुख्यालयाच्या स्तरावर असलेली कामे प्राधान्याने तत्काळ सोडविली जातील आणि रेल्वे बोर्ड स्तरावरील कामाच्या निकषांनुसार योग्य त्या सूचना पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याबैठकीस सोलापूरचे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, माढाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, लातूरचे खा. सुधाकर शृंगारे, संजीव मित्तल महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई, शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक/सोलापूर, श्री मनिजीत सिंह प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, श्री डि. के. सिंह प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, श्री. अश्विनी सक्सेना प्रधान मुख्य अभियंता, श्री. दिनेश वशिस्ठ उपमहाव्यवस्थापक, श्री. व्ही. के. नागर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, श्री प्रदिप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments