हजरत महंमद पैगंबर जयंती घरातच साजरी करावी : हाजी उस्मानशेठ तांबोळी


करमाळा/प्रतिनिधी:
             
 महाराष्ट्रात येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणारी ईद मिलाद नबी ( हजरत महंमद पैगंबर जयंती) कोवीड १९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करण्यासाठी ईद घरातच साजरी करावी, असे आवाहन पुणे  शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केली.
           
यावेळी बोलताना तांबोळी म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण भारतात लाॅकडाऊन जाहीर केल्या पासुन ते आता पर्यंत कोरोना महामारी चे संकट अद्याप पर्यंत कमी झालेले नाही आज पर्यंत नागरिकांनी प्रत्येक सण रमजान ईद. बकरी ईद मोहरम तसेच गुढी पाडवा गणेश उत्सव नवरात्र दसरा महापुरूषाचे जयंती गावोगावचे यात्रा घरातच साजरी केली. आहे राज्य सरकारने सामाजिक व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे त्या मुळे शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करून हा सण घरी राहून साधे पणाने साजरी करावा तसेच यावेळी कुठलीही मिरवणूक काढु नये.

 तसेच धार्मिक कार्यक्रम ही रद्द करावे, आजही कोरोना आजाराचे संकट टळलेले नाही येणारे तीन महीने हिवाळ्याचे असुन कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्या मुळे नोव्हेंबर ते जानेवारी हा अति दक्षतेचा काळ आहे. विदेशात सुध्दा नागरिकांनी सेल्फ लाॅकडाऊन केले आहे,  त्या मुळे नागरिकांनी  तोंडावर मास्क लावावा सोशल डिसटेंशन चे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तांबोळी यांनी केले व यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना दसरा ईद दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments