युजवेंद्र चहलची एक रोमँटिक संध्याकाळ


भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित करताना दिसला आहे. IPL संपवल्यानंतर तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. पण सध्या मात्र या जोडीचा एक रोमँटिक फोटो चर्चेत आहे.

युजवेंद्र चहलचा ऑगस्ट महिन्यात यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा झाला. त्यानंतर धनश्री आपल्या कामात व्यस्त होती आणि चहल IPLसाठी युएईला रवाना झाला. तशीच धनश्रीनेदेखील थेट स्टेडियममध्ये उपस्थिती लावली. त्यानंतर आता या जोडीने युएईमध्ये निसर्गरम्य ठिकाणी काढलेला एक फोटो खास चर्चेत आहे. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे.

Post a Comment

0 Comments