सकल मराठा समाजाकडून अकलुज ते माळशिरस पदयात्रा


पंढरपूर/प्रतिनिधी:

महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी केंद्र सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर विचार करावा व लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज, योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी ०७.३० वाजता अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तसेच अकलूज येथील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून अकलूज, संग्रामनगर, पाटील वस्ती, वटपळी मार्गे माळशिरस अशी पदयात्रा काढून माळशिरसच्या तहसीलदारांना तहसील कार्यालय, माळसिरस येथे निवेदन देण्यात येणार आहे.

मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक वेळेस खेळवले जात आहे आणि आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजातील उच्चशिक्षित मुले आरक्षणाचा प्रश्‍न सुटला नसल्यामुळे बेरोजगार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपर्यंत कित्येक बळी गेले आहेत.

 मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सकल मराठा समाज, योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी अकलूज ते माळशिरस पदयात्रात तरी सर्व जाती-धर्माच्या समाजबांधवांनी तसेच माळशिरस तालुक्‍यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments