धनगर समाजाची रक्तदान चळवळपंढरपूर/प्रतिनिधी:

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्य सरकारच्या विरोधात रक्तदान चळवळ सुरु केली आहे. रक्तदान आंदोलन पुढचे सात दिवस सुरु राहणार आहे. या काळात जवळपास दहा ते पंधरा हजार रक्त बाटल्यांचे संकलन करुन ते सरकारला दान करण्यात येणार आहे. 
   
या अनोख्या रक्तदान आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक धनगर समाज बांधवांनी रक्तदान करुन सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला आहे.य
सध्या देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. अशा संकट काळात अनेक रुग्णांचे रक्ताअभावी प्राण जात आहेत. ही चळवळ राज्यभरात दहा दिवस राबवली जाणार आहे. एक ऑक्‍टोबरपासून रक्तदान चळवळ आंदोलनाला सुरवात झाली आहे. अवघ्या तीन दिवसात राज्यभरातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक धनगर समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी करत स्वतःचे रक्त सरकारला दिले आहे. 

जिल्ह्यातही रक्तदान आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ आदी भागातील जवळपास एक हजार १३ लोकांनी रक्तदान करुन आरक्षण मागणी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती धनगर आरक्षण कृती समितीचे प्रा. सुभाष मस्के व बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments