गुगलचा नवा जावईशोध ! सारा तेंडुलकर आहे शुभमन गिलची बायको..??सारा तेंडुलकर गुगल सर्च इंजिनवर सध्या चर्चेत आहे ती एका वेगळ्यात कारणामुळे. शुभमन गिलची पत्नी असं सर्च केलं तर नाव येतं ते सारा तेंडुलकर. त्यामुळे गुगलचं नेमकं गंडलंय तरी काय? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय रहात नाही. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला रशिद खानची पत्नी असल्याचा जावई शोध गुगलने लावला होता. 

आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची पत्नी आहे असा नवा गोंधळ गुगलने घातला आहे. भारताचा युवा क्रिकेटपटून शुभमन गिलची पत्नी असे सर्च केल्यास सारा तेंडुलकरचे नाव येते आहे. सारा तेंडुलकर ही अपनालय या संस्थेसाठीही काम करते आहे. आपल्याला ठाऊकच आहे की गुगल हे सर्च इंजिन जगभरात प्रसिद्ध आहे. वाचण्यात आलेले लेख, बातम्या यांचे रिझल्ट दाखवण्याचं काम गुगल करतं. गुगल हे जगभरात लोकप्रिय असलेलं सर्च इंजिन आहे. 

विविध प्रकारच्या माहितीच्या खजिन्यापर्यंत आपल्याला गुगलद्वारे पोहचता येतं. मात्र याच गुगलचा गेल्या काही दिवसांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे रशिद खानची पत्नी सर्च केलं की अनुष्का शर्माचं नाव तर शुभमन गिलची पत्नी म्हणून सर्च केल्यास सारा तेंडुलकरचं नाव येतं आहे.

Post a Comment

0 Comments