" सुटा महिला मंचच्या वतीने ' स्तनाचा कर्करोग ' या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार यशस्वीपणे संपन्न "

प्रा.डॉ. प्रभाकर माने / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ(सुटा) महिला मंच व लायनेस क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने " स्तनाचा कर्करोग : कारणे,लक्षणे व उपाय " या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार यशस्वीपणे संपन्न झाला. या वेबिनारचा प्रमुख उद्देश हा महिलांना या विषयाच्या अनुषंगाने माहिती देणे, स्वतःची काळजी घेणेबाबत प्रवृत्त करून  त्यांचे प्रबोधन करणे हा होता.या वेबिनारचे स्वागत व प्रास्ताविक  सुटा महिला मंचच्या अध्यक्षा व समन्वयक प्रा. डॉ. इला जोगी यांनी केले.या निमित्ताने त्यांनी सुटा महिला मंचने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन  या विषयाच्या अनुषंगाने हा उपक्रम महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हाताळण्यासाठी  संघटना कशी वचनबद्ध आहे याचा उल्लेख त्यांनी केला.
        
(Advertise)

 या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते व  साधनव्यक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कर्करोग तज्ञ डॉ.सौ.शोना नाग, (सीनियर मेडिकल ऑनकोलॉजिस्ट ईस्ट व संचालक ऑन्कॉलॉजी विभाग, सह्याद्री हॉस्पिटल,पुणे) यांनी जागतिक covid-19 च्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला भाष्य करून सद्यपरिस्थितीत सुटा महिला मंच व लायनेस क्लब ऑफ कराड यांच्यावतीने महिलांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.  त्यांनी आपल्या स्तनाचा कर्करोग या  विषयाची मांडणी करताना भारतीय महिला या स्वतःच्या आरोग्याविषयी कशा अनभिज्ञ असतात व स्वतःच्या कुटुंबाच्या  कल्याणासाठी जाणीवपूर्वक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात  त्याचा परिणाम म्हणून  त्यांना कर्करोग  व इतर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच या महिलांनी स्तनाचा कर्करोग याविषयी प्राथमिक माहिती जाणून घ्यावी व आपल्याला स्तन कर्करोग आहे की नाही याची खातरजमा विशिष्ट  पद्धतीने करून  स्वतःची काळजी घ्यावी.जर संबंधित व्यक्ती ही कर्करोगग्रस्त  असेल त्यासाठी कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून डॉक्टरांची भेट घेऊन वेळीच इलाज करावा. तसेच स्वतःच्या स्तन आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांनी परिपूर्ण माहिती व ज्ञान उत्तम पद्धतीने प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. त्याचबरोबर कर्करोग याविषयी अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करून महिलांच्या मध्ये जनजागृती करण्याचं महत्त्वाचं कार्य या वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी केले.
      
सुरुवातीस पाहुण्यांची ओळख सह समन्वयक लायनेस गौरी चव्हाण, (अध्यक्ष ,लायनेस क्लब ऑफ कराड) यांनी केले.तर लायनेस वैभवी बुद्रुक (अध्यक्ष,लायनेस क्लब डिस्ट्रिक्ट) यांनी या वेबिनारच्या  उद्बोधन भाषणामध्ये आजच्या घडीला "स्तन कर्करोग" हा विषय किती गंभीर व महत्त्वाचा आहे याविषयी त्यांनी भाष्य केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नलिनी पारेख (अध्यक्ष, लायनेस क्लब मल्टिपल)  या होत्या त्यांनी महिला व आरोग्य या विषयी आपले मत व्यक्त केले.                  

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ.सौ.शैलजा माने  यांनी महिला हा घटक कुटुंबाचा मुख्य आधार असून त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी नीटपणे घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात आपलं कुटुंब आरोग्यपूर्ण व आनंद राहील. तर या वेबिनारचे आभार प्रदर्शन लायनेस मंजिरी खुसपे यांनी केले. तसेच या वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सौ. स्नेहल राजहंस यांनी आपल्या मधुर वाणीने व अत्यंत उत्तम पद्धतीने केले. 
    
सदर राज्यस्तरीय वेबिनारमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून१६७ पेक्षा अधिक महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवून या विषयाच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरांचा सत्राला ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.           

हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी  सुटाचे मार्गदर्शक  प्रा.बाबा पाटील ,प्रा.डॉ.सुधाकर मानकर,प्रा. डॉ. सुभाष जाधव, सुटा अध्यक्ष,प्रा.डॉ.आर.एच.पाटील, सुटा कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील,प्रा.ए.पी.देसाई, प्रा. एन.के. मुल्ला प्रा. डॉ. आर. के.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच कोल्हापूर,सांगली व  सातारा जिल्ह्याचे सर्व सुटा अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व सुटा महिला पदाधिकारी  व लायनेसचे सर्व पदाधिकारी यांनी उत्तम सहकार्य केले.सरतेशेवटी हा वेबिनार माहितीपूर्ण व महिलांमध्ये जनजागृती करणारा होता अशा प्रकारचे मेल चॅटिंग बॉक्समध्ये आले होतेे.एकंदरीत हा राज्यस्तरीय वेबिनार उत्तम पद्धतीने संपन्न झाल्याचे मत व्यक्त करून आयोजकांचे ही मनापासून कौतुक करण्यात आले.अशा प्रकारच्या विविध विषयांच्यावर पुढील काळात वेबिनारचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments