"राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडला"


सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. आता ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच एकनाथ खडसे यांना प्रवेश देत त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय,' असा घणाघाती आरोप माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केला आहे. 

 राष्ट्रवादीने साक्षीदार फोडण्यासाठी खडसे यांना प्रवेश दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ते म्हणाले, 'सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते मुख्य साक्षीदार होते. त्यामुळे त्या प्रकरणातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने आज केला आहे. परंतु, ही साक्ष होऊन गेली आहे. त्यामुळे या साक्षीदाराचा उपयोग राष्ट्रवादीला होणार नाही, असा टोला राम शिंदे यांनी लागवला.

Post a Comment

0 Comments