करमाळयात देवेंद्र फडणवीस तर पंढरपुरात प्रवीण दरेकर


करमाळा/प्रतिनिधी:

कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून धीर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत  प्रवीण दरेकर यांनी हे सुद्धा बारामतीपासून दौऱ्याला सुरूवात करणार आहे.

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या अतिवृष्टी झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते पुणे आणि सोलापूरचा दौरा करतील. विशेष म्हणजे, बारामतीपासून सुरुवात करुन कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परांडा या ठिकाणी पाहणी करुन उस्मानाबादकडे रवाना होतील. आज त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सोबत असतील.

विरोधी पक्ष नेते दरेकर सायंकाळी ४ वाजता सोलापूर जिल्हायातील भंडीशेवगाव, ता.पंढरपूर येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. तेथील शेतक-यांच्या बांधावर जाऊन तेथील शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वा. पंढरपूर येथील कुंभारघाटाजवळील भिंत कोसळून झालेल्या अपघातस्थळाची पहाणी करतील, तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांची सात्वंनपर भेट घेणार आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर २० ऑक्टोबर रोजी सोलापूर व सांगली मधील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर २० ऑक्टोबर रोजी सोलापूर व सांगली मधील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत.

सकाळी १० वाजता संगोगी (ब), ता. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यात येईल. सकाळी १०.३० वा. अंधेवाडीज, ता. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करतील. त्यानंतर दुपारी १२ वा. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. दुपारी १२.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दरेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Post a Comment

0 Comments