पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…- एकनाथ खडसे


शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली ४० वर्षे ज्या निष्ठेने भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन. मी भाजप पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवे, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. आज पक्ष प्रवेश करतेवेळेस बोलत असताना, त्यांनी राष्ट्रवादीचे काम वेगाने करेन असे सांगितले.

मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभं राहिलं, तर मी कुणालाही घाबरत नाही, असंही खडसे यावेळी म्हणाले.

तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपची सेवा केली, त्याबदल्यात मला काय पक्षाने दिलं?, असा सवाल खडसेंनी केलाय.

Post a Comment

0 Comments