कोरोनारुपी रावणाचा नाश करुया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ.

आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

आपण दसरा उत्साहात साजरा करत असतानाच करोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments