बार्शी ! आमच्या शेळ्या राखायला घेऊन जात नाही म्हणून नारीत वृद्धास मारहाण; पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


 
पांगरी/प्रतिनिधी:

तु आमच्या शेळ्या का राखायला घेऊन जात नाही, तु माझ्या शेळ्या राखल्या नाहीस तर तुला जिवे ठार मारीण अशी धमकी देऊन एकाला लोखंडी पाईपने मारहाण करूण जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील नारी येथे घडला.
सुरेश बाबु मोरे नारी ता. बार्शी असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

धोडीराम श्रीपती झोंबाडे,वय (६० वर्षे) नारी,ता बार्शी या वृद्धाने याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, ते गावातील निबांळकर यांचे किराणा दुकानात लहान मुलांना खाणेसाठी फरसाण आणायला गेला होता.

त्यावेळी गावातील सुरेश बाबु मोरे हा किराणा दुकानासमोर आला व म्हणाला की तु माझ्या शेऴया का राखायला घेवुन जात नाही. असे म्हणत त्यांने शिवीगाऴ करण्यास सुरूवात केली त्यावेऴी तो मला शिवीगाऴी करू नका असे म्हणताच हाताने व लाताबुक्याने माराहण करण्यास सुरूवात केली. त्यांने तेथे पडलेला लोखंडी पाईप घेवुन  डावे पायाच्या पिढंरीवर मारल्याने  पिंढरीमधुन रक्त येत असताना मी मोठ्याने ओरडलो तेंव्हा तेथेच असलेले दिपक शिंदे,सुरेश निबांऴकर यांनी आमची भांडणे सोडवा सोडव केली. तेंव्हा मला म्हणाला की तु माझ्या शेऴया नाही राखल्या, तर तुला जिवे ठार मारीन असे म्हणुन निघुण गेला. पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments