दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस हंगाम सुरू करू नयेत- भाऊसाहेब झोळ



अन्यथा रस्त्यावर उतरु

१९ व्या ऊस परिषदेत, दर ठरवल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने हंगाम सुरू करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. ऊसदर जाहीर झाला नसतानाही साखर कारखाने मात्र सुरू झाले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी सांगितले, की दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस हंगाम सुरू करू नयेत; अन्यथा आम्ही ऊसतोड बंद पाडू. 

वाशिंबे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अण्णासाहेब झोळ म्हणाले, परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करणे गरजेचे असून, प्रत्येक कारखान्यावर कोव्हिड सेंटर उभा करणे गरजेचे आहे. 

यंदाच्या गळीत हंगामाची सुरवात १५ ऑक्‍टोबरपासून होणार आहे. असे असले तरी करमाळा तालुक्‍यातील भैरवनाथ शुगर तसेच कमलाई शुगर या खासगी कारखान्यांनी आपले धुराडे पेटवले असून, हे कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. 

Post a Comment

0 Comments