"धनदांडग्या प्रस्थापितां नो बेरोजगार दलित युवकांना हाताशी धरून नथीतून तीर मारणे बंद करा ?" - दशरथ (अण्णा) कांबळे


    
 गेल्या अनेक दिवसापासून सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी धनदांडग्या प्रस्थापितांन मध्ये संघर्ष सुरू आहे त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार असलेल्या दलित व्यक्तींना बळीचा बकरा करून ॲट्रॉसिटी सारख्या दलित समाजाचे सुरक्षा कवच असलेल्या कायद्याचा वापर होत असताना दिसत आहे.
   
 धनदांडग्या प्रस्थापितांच्या मनगटा मध्ये जर दम असेल तर सत्ता संपत्तीसाठी त्यांनी समोरासमोर येऊन लढावे गरिबांच्या आर्थिक कमकुवतीचा गैरफायदा घेऊन आपले नपुसंक पणा सिद्ध करू नये.
     
दलित व्यक्तींना माझे आवाहन आहे की बाबांनो आपल्याला कायद्याने मिळालेल्या सुरक्षा कवचाचा धनदांडग्या प्रस्थापितांकडून गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्या भावनिक होऊ नका त्यांच्या दडपणाला घाबरू नका..
   
कारण एखाद्या ठिकाणी खरंच ॲट्रॉसिटी सारखा शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्यास हेच प्रस्थापित धनदांडगे आपल्याकडे खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून संशयाने पाहतात गरीब बहुजन समाजातील तरुणांना भडकवतात व संपूर्ण समाजाला बदनाम करतात; परंतु अशा या प्रकरणात जर तुमच्यावर कोणाचे दडपण आले किंवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्याशी संपर्क करा.
    
समाजातील धनदांडग्या प्रस्थापितांना माझे आवाहन आहे की  असे प्रकार पूर्वीसुद्धा झालेले आहेत येथून पुढे तुमच्या सत्ता संपत्तीच्या संघर्षात तुमच्या मनगटात दम असेल तर तुमच्या हिमतीवर एकमेकांची जिरवा आमचे उसणे अवसान घेऊ नका
    
 पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की अशा प्रकरणात धनदांडग्या प्रस्थापितांचा वैयक्तिक हस्तक्षेप किंवा राजकीय दडपण आणण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास धनदांडग्या प्रस्थापितांविरोधात समाजद्रोही किंवा कायदेशीर गुन्हा दाखल करावा...!
                    
            
     

Post a Comment

1 Comments