अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरसोबत एकत्र होते. रियल लाईफमधल्या या जोडीने सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण आजही शाहिद-करीनाच्या नात्याची चर्चा होते.
आताच्या घडीला हे दोघेही त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण करीनाने जुन्या आठवणींना उजाळा देत शाहिद कपूरसोबत एक फोटो शेअर केला आहे. 'जब व्ही मेट' या चित्रपटातील हा फोटो आहे. चाहत्यांनी चित्रपटातील करीना आणि शाहिदच्या जोडीला चांगलेचं डोक्यावर घेतले होते.
ती म्हणते, 'जीवनात जी गोष्ट माणसाला खरचं हवी असते, ती गोष्ट त्याला नक्की मिळते.' असं कॅप्शन तिने या फोटोला दिले. सध्या शाहिद आणि करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय चित्रपटाचा दुसरा भाग लवकरात लवकर यावा अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.
0 Comments