केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगा चिराग पासवान यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. या संदर्भात बिहार निवडणुकीच्या धामधुमित चिराग पासवान यांनी त्याची प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली होती.
0 Comments