एकनाथ खडसे घणाघात!“अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता आणि…,”


विधानसभेच्या निवडणुकीत योग्य निर्णय घेतले असते तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं असा दावा भाजपामधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. 

अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे अशी विचारणा केली.

“विधानसभेनंतर शिवसेनेसोबत युती केली असतं तर सरकारमध्ये आलो असतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यापेक्षा शिवसेनेसोबत युती केली असती तर कदाचित दोघं राज्यात आले असते. अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments