स्वतःच्या व्यावसायिक दूश्मनीसाठी अॅट्राॅसिटी चा गैरवापर करणारांची नार्को टेस्ट करा - नागेश कांबळेसोनाई तसेच नेचर डेअरी च्या संकलकांच्या तर्फे वादातून परस्परांवर अॅट्राॅसिटी चे गून्हे

करमाळा/प्रतिनिधी:

तालूक्यात सोनाई तसेच नेचर डेअरी च्या प्रमूख यांच्यातील वादात दाखल अॅट्राॅसिटी च्या गून्ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच आरोपी व फिर्यादी यांची नार्को टेस्ट व्हावी,यात राजकीय लोकांकडून जाणीवपूर्वक अॅट्राॅसिटी चा गैरवापर झाल्याची चर्चा आहे. असे निवेदन रिपाई (आ) चे नागेश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते, इंदापूर सोनाई दूध डेअरीचे प्रमूख दशरथ माने तसेच भाजपा तालुकाध्यक्ष तसेच दूध संकलक गणेश चिवटे यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून दूध व्यवसायात संबंध असून १ आॅक्टोबर पासून दूध दरवाढी तसेच संकलनाबाबत स्पर्धेतून वाद झाल्याचे पर्यावसन भांडणात झाले यासंबंधी सर्व वृतांत विविध वृत्तपत्रांतून देखील आलेला आहे. याच वादातून दोन्ही कडील समर्थकांकरवी माने तसेच चिवटे यांच्यावर अॅट्राॅसिटी चा गून्हा दाखल झालेला असून, या प्रकरणात एका वरिष्ठ मंत्र्याने हस्तक्षेप केल्याची चर्चा चालू आहे .
अॅट्राॅसिटी कलम १८ मधील तरतूदी नूसार आरोपीला अटकपूर्व जामीन भेटत नाही हेच यामागील खरे कारण असून राजकीय लोकांकडूनच या कायद्याचा गैरवापर होत असून सदरिल प्रकरणामुळे तालूक्यातील जनतेत चीड निर्माण झालेली आहे. कायद्याचा चा गैरवापर करणारी हि किड मूळासकट उपटून काढली जावी यासाठी सदरिल प्रकरणातील फिर्यादी व आरोपी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी तसेच याची उच्चस्तरीय चौकशी चौकशी करण्यात यावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन अनुसूचित जाती जमाती आयोग,मुख्यमंत्री,मा जिल्हाधिकारी,मा तहसीलदार यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे

Post a Comment

0 Comments