करमाळा येथे नागेश (दादा) कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका देऊन वाढदिवस साजरा


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळ्यात नागेश(दादा)कांबळे यांचा सर्व समाजघटकांन कडून भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका देवून सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी क.न.प चे माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ, महेशजी चिवटे, सावंत गटाचे नगरसेवक संजय सावंत, बामसेफचे बाबा ननवरे, दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, तळपदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 दिपकरावजी ओहोळ यांनी भविष्यात संविधान सन्मान रॅली सारख्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करावे असे मत व्यक्त केले .महेशजी चिवटे यांनी नागेशदादांनी पंधरा वर्षांपूर्वीची राजकीय पद न घेण्याची शपथ मोडून पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारखाना, नगरपालिका निवडणुका लढवावी असे आवाहन केले.तसेच नागेशदादांनी भिम उस्तवाची सुरुवात करण्याची घोषणा केली. 
पंधरा वर्षांची शपथ कायम ठेवत मी जर एखाद्या गटा कडून निवडणुक लढवली तर मी समाजाला न्याय देऊ शकणार नाही, असे प्रतिपादन केले यावेळी  नासीर कबीर, अशोक नरसाळे, सचिन जव्हेरी, दिनेश मडके, मनसेचे नाना मोरे, नगरसेवक महादेव फंड,नगरसेवक राजू आव्हाड, खरात सर, संभाजी ब्रिगेडचे नितिन खटके, बी एम पी चे आर.आर.पाटील,अर्बन बँकचे अरूण माने, दिनेश दळवी, रामभरोसे हाॅटेलचे मालक जगदीश आगरवाल, मातंग एकता आंदोलनचे शरद पवार, फारूकभाई जमादार, भारिपचे शहाजी ठोसर,बाबा घोडके,राजू कांबळे, सिध्दार्थ कांबळे,युवा तालुकाध्यक्ष यशपाल कांबळे,नितीन दामोदरे,विजय वाघमारे, प्रसेनजित कांबळे, बाळू कांबळे, ताया वाघमोडे, कालिदास पवार, नंदू कांबळे, नंदू शिंदे, सुनिल सोनवणे व सर्व समाज घटक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments