चेन्नई सुपरकिंग्जचा मुंबईच्या गोलंदाजांनी केला खुर्दा


आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अपयशाची मालिका मुंबईविरुद्ध सामन्यातही सुरुच राहिलेली आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धोनी फलंदाजीसाठी उशीरा येत असल्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात अखेरीस धोनीला लवकर फलंदाजीची संधी मिळाली. 

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज कामगिरी करत पॉवरप्लेमध्येच चेन्नईचा निम्मा संघ माघारी धाडला. दुसऱ्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. याआधी २०१० साली दिल्लीविरुद्ध सामन्यात धोनी तिसऱ्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सामन्यात धोनी आपला दुसरा चेंडू खेळत असताना शून्यावर माघारी परतला. राहुल चहरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत धोनीने आपले इरादे स्पष्ट केले. परंतू त्यानंतर लगेचच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी बाद झाला.

१६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह धोनी १६ धावा काढून माघारी परतला. चेन्नईने आजच्या सामन्यासाठी संघात ३ बदल केले. परंतू ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईचा एकही फलंदाज तग धरु शकला नाही. अखेरच्या फळीत सॅम करनने फटकेबाजी करत आयपीएलच्या इतिहासातला निच्चाकी धावसंख्येचा विक्रम चेन्नईच्या नावे जमा होणार नाही याची काळजी घेतली.

Post a Comment

0 Comments