जय हनुमान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गौंडरे यांच्या कडून सीना कोळेगाव धरणाचे पाणी सोडण्याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन.....


गौंडरे/प्रतिनिधी:

सीना कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून गौंडरे कॅनॉलमध्ये, पाझर तलावामध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेतर्फे पाटबंदरे विभागाचे आधिक्षक अभियंता यांच्या निवेदनाद्वारे केली आहे. जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामहरी बिचितकर उपाध्यक्ष नागेश कापले तर सचिव अक्षय हनपुडे हे आहेत.
यंदा पाऊस चांगला झाला असला तरी अजूनही गौंडरे गावांत अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे गावांतील पाझर तलाव, कॅनॉल मध्ये पाणी सोडून गावांतील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा. ह्या निवेदनवर दिनकर हनपुडे, श्रीमंत जगताप, जयंत जगताप, दत्तात्रय हनपुडे, आप्पासाहेब सपकाळ, माधव हनपुडे, भास्कर अंबारे, पोपट अंबारे, बाळासाहेब अंबारे, पोपट हनपुडे, नागनाथ हनपुडे, अभिजित धोंडे, सुलन शिंदे, दत्तात्रय शिंदे, सोमनाथ जगताप, पवन पारेकर, रामहरी बिचितकर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

ह्या निवेदनाच्या प्रति जलसंपदा मंत्री, उस्मानाबाद जिल्हाधिकारी व तहसीलदार करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments