सलग तिसर्‍या दिवशी सोने झाले स्वस्त



सोन्याच्या भावात सलग तिसर्‍या दिवशी घट झाली आहे. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये मौल्यवान धातूंचे नवीन दर जाहीर झाल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. डॉलरला मजबुती मिळाली आहे, त्यानंतर पिवळ्या धातूची मागणी खाली आली आहे. गुरूवारी चांदीचे दरही खाली आले आहेत. पहिल्या दोन व्यापारी सत्रांमध्ये म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली.

सोन्याचे नवीन दर 

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ३२ रुपयांची घट झाली आहे. यानंतर आता सोन्याची नवीन किंमत प्रति १० ग्रॅम ५१,५०३ रुपयांवर पोहोचली आहे. पहिल्या व्यापारी सत्रात सोन्याचे भाव ५१,५३२ रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास सोन्याची किंमत प्रति औंस १९०१ डॉलर होती.

चांदीचे नवीन दर 
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीच्या किंमतीत गुरुवारी मोठी घसरण दिसून आली. आज चांदी ६२६ रुपये प्रतिकिलो स्वस्त झाली आहे आणि ६२,४१० रुपयांवर आली आहे. पहिल्या व्यापारी सत्रात चांदीची किंमत प्रति किलो ६३,०३६ रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर औंस २४.१८ डॉलर होता.

Post a Comment

0 Comments