मध्य प्रदेशातही गँगरेप; पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही, पीडितेची आत्महत्या


 मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ४ दिवसांपासून एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होती. मात्र, पोलिसांनी पीडितेला शिवीगाळ करत पैशाची मागणी केली. निराश झालेल्या पीडितेनं शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकारी आणि आरोपींविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एफआयआर न नोंदवल्यामुळे पौलिस चौकी प्रमुखाविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  

पीडित महिला नरसिंहपूरच्या रिछाई गावातील सहिवाशी आहे. ती २८ सप्टेंबर रोजी शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिच्यावर शेजारील तिघांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित महिला तक्रार नोंदवण्यासाठी गोटिटोरिया पोलिस चौकी आणि चीचली स्थानकात अनेकवेळा गेली. पण तिच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर पीडितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पीडित महिलेच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, पोलिस ठाण्यातील पोलिसाने तिला मेडिकल चाचणी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मेडिकल रिपोर्ट घेऊन पोहोचलो तेव्हा पीडितेच्या कुटुंबियांनाच पोलिसांनी पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. पैसे घेतल्यानंतरच कुटुंबियांना घरी जाऊ दिले. चार दिवस पोलिसांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना चकरा मारायला लावल्या आणि शेवटी पीडितेने कंटाळून आत्महत्या केली.

Post a Comment

0 Comments