शोपियामध्ये चकमक: सुरक्षा दलाकडून टॉप कमांडरसह ३ दहशतवादी ठार


पोलीस व सुरक्षा दल कडून कार्यवाही 

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. शोपियांमधील सुजान सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू होतं. 

त्याचं वेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या या चकमकीत टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर परिसरात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत.

Post a Comment

0 Comments