व्हेटिंलेटरवर असलेल्या २१ वर्षीय महिलेवर कर्मचाऱ्याने केला बलात्कारश्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात दाखल करण्यात आलेल्या एका २१ वर्षीय महिलेवर कर्मचाऱ्यानं बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला क्षयरोग (टीबी) असल्याचं निदान झाल्यानंतर व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हि घटना हरियाणा मधील गुरुग्राम मध्ये घडली.

त्याचवेळी एका कर्मचाऱ्यानं हे क्रूर कृत्य केलं. पीडितेनं वडिलांना लिहून घडलेली आपबिती सांगितली. गुरूग्राममधील एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, संशयित आरोपीची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पीडिता काही आठवड्यापासून बेशुद्धावस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने हा सगळा प्रकार वडिलांना सांगितला. पीडितेचे वडील तिला भेटायला आल्यानंतर तिने बलात्कार झाल्याचं सांगितलं. पीडितेनं एक चिठ्ठी लिहून याची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सुशांत लोक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments