आमदार तानाजी सावंत व खासदार ओमराजे वालवड परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणीवालवड/प्रतिनिधी:

भूम तालुक्यातील वालवड परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची माजी मंत्री आ.प्रा.तानाजीराव सावंत साहेब व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून धीर दिला. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांस तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.

यावेळी माजी आ.ज्ञानेश्वर पाटील, जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, संजय नाना गाढवे, आण्णासाहेब देशमुख, जि.प.सदस्य दत्ता आण्णा साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, भूम पं.स.उपसभापती बालाजी गुंजाळ, तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, सुभाष सिद्दीवाल, मेघराज पाटील, रणजित पाटील, तहसीलदार अनिल हेरकर, तालुका कृषी अधिकारी मोरे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments