विजयादशमी निमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला झेंडूची आरास


पंढरपूर/प्रतिनिधी:

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विजयादशमी (दसरा) निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात झेंडूच्या फुलाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील ही सुंदर सजावट पुण्यातील भक्त राम जांभुळकर यांनी केली आहे.
नवरात्रिनिमित्‍त श्री विठ्ठल, श्री व्यंकटेश, श्री महालक्ष्मी मातेची पारंपरिक पोशाखात आकर्षक अलंकार पूजा बांधण्यात आली होती. नऊ दिवसात रुक्‍मिणी मातेचं रूप मनमोहक दिसत आहे.विठ्ठल व रूक्मिणी मंदिरात गाभारा व समोरील मंडपात फुलांची आरास करण्यात आली आहे.

या सोबतच मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे.यामुळे मंदिरातील वातावरण मनमोहक दिसत आहे. भाविकांना दर्शनाकरिता मंदिर बंद असले तरी मंदिरातील सर्व नित्योपचार दररोज सुरू आहेत. यामुळे नवरात्रोत्सवानिमित्त याचे दर्शन घरबसल्या भाविक, नागरिक याना मंदिर समिती च्या वेबसाईट, फेसबुक वरून घेता येत आहे.

Post a Comment

0 Comments