"चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय"




चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

मी चंद्रकांत पाटलांसारखी तारीख पे तारीख देणार नाही. आल्यापासून त्यांनी निर्माण केलेले खड्डे बुजवतोय. दुसरं कामच उरलेलं नाही. हे खड्डे दिसावेत आणि ते तात्काळ बुजवून घेता यावेत म्हणून विमानाऐवजी गाडीनेच फिरत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसकडे असलेल्या पालिकांना निधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नसल्याचं सांगत चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आघाडीत अजूनही बिघाडी असून काँग्रेस सत्तेत असूनही नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, चव्हाणांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सारवासारव केली आहे. चव्हाणांचं ते वक्तव्य हे युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांबाबतचं आहे. 

Post a Comment

0 Comments