जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम


 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स  २०२० परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा एकूण १.६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगइन करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.


 सर्वप्रथम jeeadv.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करा.
 होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 वर क्लिक करा.स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरा.JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल. रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

चिरागने ३९६ गुणांपैकी ३५२ गुण मिळवत यश संपादन केले आहे. जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४३ हजार २०४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पैकी ६ हजार ७०७ मुली आहेत.

Post a Comment

0 Comments