जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई शेख यांचे आकस्मिक दुःखद निधन


अक्कलकोट/ प्रतिनिधी:

बहुजन समाज पार्टी च्या भाईचारा कमिटी चे सोलापूर  जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते व खाजभाई यांचे अंत्यत विश्वासु व  खंदे समर्थक इरफान भाई शेख (रा. बरूर ) यांचे आकस्मिक निधन झाले आहे, ते मृत्यू समयी ४५ वर्षांचे होते, त्यांच्या पश्श्यात पत्नी, एक मुलगा आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

हिंदु मुस्लिम  व दलित समाजात सदैव ऐक्य राहावे म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून कार्य करत होते, त्यांचे सामाजिक कार्य पाहुन बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख बहन मायावती यांनी त्यांची पक्षाच्या भाईचारा कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून नियुक्ती केली होती.

अंत्यत दिलदार आणि शांत स्वभावाचे ते होते त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments