बार्शी बाजार समिती: जुनी ज्वारी, तुरी यांना मिळतोय चांगला भाव ; शेतकरी आनंदात


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून मालाची आवक होते. बहुतांश शेतकरी माल निघाला की, विकून टाकतात. गरजेनुसार आर्थिक प्राप्ती करुन घेतात.

काही शेतकरी आपला माल वेअर हाऊस ला ठेवतात, त्यांना चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. ज्वारी प्रतिक्विंटल ४ हजाराच्या पुढे तर तुर हि प्रतिक्विंटल ७ हजराच्या घरात गेल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ग्राहकातून मागणी वाढल्याने तुरीला चांगला भाव मिळत आहेत, अशी माहिती गौरी इंटरप्राईजेस चे मालक संतोष देवराम यांनी सांगितले.

______________________________________

🪀 *लोकवार्ताच्या अपडेट Whatsapp च्या माध्यमातून त्वरित मिळवण्यासाठी आजच जॉईन करा:-*
http://connect.lokvaarta.in/

______________________________________

Post a Comment

0 Comments