जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर


 वर्ष २०२० मध्ये सर्वात शक्तीशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे .प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.पण यावर्षी भारताला दोन अंकाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०१९ च्या यादीत भारत जगातील शक्तीशाली देशांच्या यादीत होता.पण यावर्षी कोरोना विषाणूमुळे भारत या यादीतून बाहरे झाला आहे.
________________________________________
📢
(Advertise)
________________________________________

सिडनीतील लोवी इंस्टीट्यूटच्या अशिया पॉवर इंडेक्स २०२० नुसार, २०१९ मध्ये भारताचा स्कोअर ४१.०० होता. तो आता २०२० मध्ये घटून ३९.७ झाला आहे. या लिस्टमध्ये ज्या देशाचा स्कोअर ४० किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यालाच जगातील शक्तीशाली देश मानला जातो.गेल्यावर्षी भारताचा या यादीत समावेश होता. पण यावर्षी थोड्या अंकानी भारत यादीतून बाहेर झाला आहे.

Post a Comment

0 Comments