माता तू न वैरीणी! दोनचं दिवसापूर्वी जन्मलेले बाळाचा घोटला गळा


सांगली: काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना सांगली मध्ये घडली आहे. मुलीच्या  जन्मानंतर अवघ्या ४२ तासात  जन्मदात्या आईने पोटच्या बाळाच्या गळ्याचा घोट घेतल्याचा धक्कादायक प्रकार सांगली विश्रामबाग येतील शासकीय रुग्णालयात उघडकीस आला आहे.
_________________________________________
📢
(Advertise)
________________________________________

 या प्रकरणी निर्दयी आई सुमित्रा गंगाप्पा जुट्टी, या महिलेच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  ह्या प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी त्यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र त्यानंतर  काही वेळाने तिने आपल्या या नवजात मुलीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. 
_________________________________________
📢
(Advertise)
_________________________________________
सदर घटनेची माहिती त्या ठिकाणी वार्डमध्ये असणाऱ्या एका महिलेने, डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी परिचारिकेला पाठवून त्या नवजात अर्भकाची तपासणी करण्यास सांगितले असता. त्यांनतर रुग्णालय  प्रशासनाकडून त्या मुलीवर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास त्या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments