'आशिकी गर्ल'चं बॅकलेस फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अभिनेत्रींच्या सौंदर्याची कायमच प्रशंसा केली जाते. त्यांचे नवनवीन लूकही व्हायरल होतात. ट्रेंडमध्ये येतात. पण,अभिनेत्रींची छाया टीपण्याचं सुरेख कसब आणि श्रेय हे छायाचित्रकाराचंही तितकंच असतं. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री श्रद्धा कपूर  हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये श्रद्धाच्या बॅकलेस लूकनं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे. 

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर डब्बू रत्नानी यानं पुन्हा एकदा त्याच्या फोटोग्राफी कौशल्याची झलक या फोटोतून दाखवून दिली आहे. डब्बू रत्नानीनं २५ व्या वर्षासाठीच्या कॅलेंडर शूटसाठी काही कलाकारांची छाया टीपली आहे. श्रद्धाचा हा फोटो त्याचाच एक भाग. सौंदर्याची एक वेगळीच परिभाषा हा फोटो पाहताना लक्षात येते. पाठीवरून सुटलेले मोकळे केस, चेहऱ्यावर वेगळंच हसू आणि कुणीकडेतरी रोखलेली नजर असं तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळच झाले.

डब्बू रत्नानीनं त्याच्या कॅलेंडर शूटसाठी यावेळी ए लिस्टर्स आणि काही नव्या जोमाच्या कलाकारांची निव़ड करत त्यांचे सुरेख फोटो काढले आहेत. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चनपासून सनी लियोनी, कियारा आडवाणी, आलिया भट्ट, रणबीर कपूर या कलाकारांच्या फोटोंचा यात समावेश आहे. तूर्तास लक्ष वेधतेय ती म्हणजे 'आशिकी गर्ल' श्रद्धा. 

Post a Comment

0 Comments