“भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”


भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात, असा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. मात्र हे पुढे येऊन बोलायला भाजपचे नेते घाबरतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपच्या नेत्यांकडून पाठीमागून का होईना, कौतुक होतंय हे अभिमानास्पद आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. 

Post a Comment

0 Comments