श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने सेवा सप्ताह कार्यक्रम


   
लोणी/प्रतिनिधी:-आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महा एन जि ओ फेडरेशन पुणे, श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरीच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय,राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारताचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने व श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने सेवा सप्ताह राबविण्यात आला. 

सेवा सप्ताह कार्यक्रमात कपिलापुरी येथे वृक्षारोपण, आरोग्यासाठी स्वछता व काळजी घेण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माझे कुटूंब माझी जबाबदारी व नवीन शैक्षणिक धोरण या बद्दल माहिती व्हाट्सएपच्या माध्यमातून देण्यात आली.

वृक्षारोपण,गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान,कोरोना विषयक जनजागृती,अन्नधान्य किट्स वाटप, स्वच्छता शपथ इ.विविध उपक्रम राबविण्यात आले.महा एन जी ओ फेडरेशन पुणे यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रहित उपक्रम राबविण्यासाठी तयार असे श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments