राज्यात पाऊसाचा मुक्काम वाढला २१ ऑक्टोबर पर्यंत कोसळणार पाऊस



कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता हळूहळू का होईना ओसरत असतानाच हवामानात झालेल्या बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊसाची स्थिती तयार होत आहे राज्यभरात पावसाचा मुक्काम २१ ऑक्टोबरपर्यंत असेल याकाळात राज्यात अनेक भागात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

 हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज १८ ऑक्टोबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

१९ ऑक्टोबर रोजी - ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद. 

ह्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल अशी शक्यता उरतवली आहे.

 

Post a Comment

0 Comments