पंचनाम्याचे कागदी घोडे वाचण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी : अखिल भारतीय किसान सभा निवेदनाद्वारे मागणी



बार्शी/प्रतिनिधी:

राज्यात परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी सरकारनं तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून होतेय. पण सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींचे पाहणी दौरे सोडले तर अद्याप मदत जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरचं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी.
_______________________________________
📢
(Advertise)
__________________________________________

प्रतिहेक्‍टरी सरसकट २५ हजार अनुदान द्यावे, शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावे, रेशन धान्य मिळावे, फुटलेल्या ओढ्या लवकरात लवकर दुरुस्त करावी, श्रीपत पिंपरी येथील ओढ्याची उंची वाढवावी, बँकाकडून त्वरित कर्जपुरवठा व्हावा, पंचनाम्याची कागदी घोडे नाचवणे पेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी.

हे आंदोलन तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले व यानंतर तहसीलदारांना यांना निवेदन देण्यात आले. यावेळी  लक्ष्मण घाडगे, प्रवीण मस्तूद, बाळासाहेब जगदाळे, अनिरुद्ध नकाते, भारत भोसले, शिवाजी घाडगे बालाजी ताकभाते शिवाजी पिंगळे पवन आहिरे शापित बागवान बालाजी शितोळे हरिभाऊ घाडगे दत्तात्रय जगदाळे पैगंबर मुलानी, तानाजी काकडे रामेश्वर शिकतोडे आदी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments